Name:
Location: Pune, Maharashtra, India

Software Engineer, Project Manager, Nakshatra Jyotish Ratna

Sunday, January 15, 2006

दर्शकहो तुमच्या हाती. . .

माझ्या आधीच्या लेखा बद्दल आशिष दिक्षीत यांनी खालील अभिप्राय नोंदविला आहे:

"त्या वहिनीने ज्याप्रकारे गुडियाच्या खाजगी जीवनात सीमोल्लंघन केले ते कदापि समर्थनीय नाही. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे यास हा "बलात्कार" पाहणारे दर्शकही काही प्रमाणात जबाबदार आहेत. तुमच्या एकूण कथनावरून असे वाटते की तुम्हीही हा "बलात्कार" live पाहिलेला आहे. मग तुम्ही दोषी नाहीत का?"

त्यांचे बरोबरच आहे. हा बलात्कार मी सुद्धा पाहिला असल्यामुळे मी सुद्धा काही प्रमाणात दोषी आहे. माझ्या सारख्या अनेक दर्शकानी "तो" बघितल्यामुळे "त्या" वाहिनीची टि.आर.पी. रेटिंग वाढले आणि त्यांना, व इतर काही वाहिन्यांना असे बलात्कार वारंवार करण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या मते मिडीया जे काही करते ते दर्शकांसाठी करते. त्यामुळे आपण दर्शकच अशा बेलगाम उधळलेल्या अश्वांना लगाम घालु शकतो. त्यांना वेळीच आवरले नाही तर उद्या असे सिमोलंघन करण्याची स्पर्धाच सुरु होईल आणी हे कार्यक्रम आणखी विकृत रुप घेतील.

असेच एका वाहिनीवर मुंबईतील एका लहान मुलीच्या व्यथेचा बजार मांडला होता "सनसनी" म्हणुन. तिला तिच्या वडिलांनी घरात कोंदुन ठेवले होते व वारंवार तिला चटके दिले होते. हा एक कार्यक्रम बघण्याचा गुन्हा सुद्धा मी केला. या कार्यक्रमात दर्शक़ांकडुन प्रतिक्रीया मगविल्या गेल्या. दर्शकांच्या, तिच्या वडिलांबद्दलच्या तिव्र प्रतिक्रियांवर त्या कोवळ्या मुलीकडुन तिची प्रतिक्रीया घेण्याचा अमानुष खेळ जवळपास दिवसभर ती वाहीनी आणी तो पत्रकार करत होते, त्या मुलीच्या भावनांचा, तिच्या मानसिकतेचा विचार न करता. आणि दर्शक सुद्धा उत्स्फुर्त पणे आपल्या प्रतिक्रीया नोंदवित होते.

वाहिन्या, नैतिकता सोडुन इतक्या पुढे जाण्याचे कारण, दर्शकांचा असल्या कार्यक्रमांना मिळणारी पसंतीच आहे. चॅनल्सवरच्या सासु-सुनांच्या भांडणाला, बदल्याच्या प्लॉट्सना टिवीसमोर सर्व काम सोडुन बसुन चविने चघळणार्‍या दर्शकांकडुन दुसरे तरी काय अपेक्षित आहे!

2 Comments:

Anonymous Anonymous said...

निलेश,
माझ्या commentची तुम्ही तुमच्या पोस्टमध्ये दखल घेतल्याबद्दल धन्यवाद! माझ्या मते मीडिया आणि दर्शक तर जबाबदार आहेतच, पण खरं सांगू का, सध्या मीडियामध्ये चालू असलेली जीवघेणी स्पर्धा खरी गुन्हेगार आहे. आजघडीला एकूण टी.व्ही. पाहणा-या दर्शकांमधले केवळ २% लोकं न्यूज चॅनल्स पाहतात (हा भाग निराळा की त्यांतून त्यांना ११% ad spent मिळतो)! आता viewership वाढवण्यासाठी त्यांनी मोहरा वळवला आहे तो सीरियल्समध्ये रमणा-या मंडळींकडे. मालिकांमधल्या घिस्यापिट्या नाट्याला कंटाळलेल्या दर्शकांनाही खराखुरा आणि live थारार पहायला नक्कीच आवडतोय. यात वाईटही काही नाही, पण फक्त तोवर, जोवर कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ होत नाही.
आणखी एक गोष्ट अशी की बरीच जणं अशा भ्रमात असतील की आपण एकट्याने हा कार्यक्रम नाही पाहिला तर काय फरक पडणार आहे? TRPs मोजण्याची पद्धत जरी थोडी सदोष असली तरी जाहिरातदारांना कोणता कार्यक्रम किती पाहिला जातो हे बरोबर कळतं असतं. त्यामुळे ग्राहकराजा, (मीडियातली मंडळी वाचक आणि दर्शकांना 'customers' असंच म्हणतात!) जर तू वाईट कार्यक्रम पाहिला नाहीस, तर तो लोकप्रिय होणार नाही, मग जाहिरातदार पाठ फिरवतील आणि असे एक-दोन वेळेला ओठ पोळले की न्यूज चॅनल्सवाले आपणहून असले अनैतिक कार्यक्रम बंद करतील. काय मग, नाही ना पाहणार?
आपला,
ashish.scribe@gmail.com

7:12 AM  
Anonymous Anonymous said...

लिहिणं का थांबलस? वाट पाहतोय..

5:44 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home