Name:
Location: Pune, Maharashtra, India

Software Engineer, Project Manager, Nakshatra Jyotish Ratna

Tuesday, January 24, 2006

भुतांना उतरवा. . .

काही दिवसांपुर्वी मी राहतो त्या वसाहतीत, पोलिस चौकी जवळील एका चाळी मध्ये एका सातवीतल्या मुलाला भुताने (किंबहुना भुतांनी) झपाटल्याची खबर आली. शाळेतुन येतांना तो निलायम टॉकीज जवळ रस्त्यात लघवी करायला थांबला. तिथे त्याने एका "उतार्‍यावर" लघवी केली. तिथुन तो घरी व्यवस्थित आला, मात्र घरी आल्यावर तो विचित्र वागायला लागला. मग काय सगळ्या वसाहतीत तिच चर्चा. त्या मुलाच्या मानगुटीवर बसलेलं भुत उतरवायला एकच स्पर्धा लागली होती. मुसलमानी फकीर आणले. पण ती भुतं काय काबुत येईनात. मग कोणीतरी सांगितले की त्याला हिजड्यांच्या भुताने झपाटले आहे. ते उतरवायला त्यांच्या पैकीच कोणीतरी लागेल. मग अस कंक्लुजन निघाले की त्याला एका भुताने झपाटले नसुन साधारण 35 भुतांनी झपाटले आहे. एका फकीराने त्यातली 12 भुते उतरविल्याचा दावा केला आणी मोबदला घेउन गेला. उरलेली भुतं ईतर फकीरांच्या व बुवांच्या पोटापाण्याचा विचार करुन, त्यांच्यासाठी ठेउन गेला.
ह्या सर्व कामी वसाहतितील तरुण मुल सुद्धा पुढाकार घेत होती. त्या मुलाला 35 भुतांनी झपाटले आहे म्हणुन त्याचा चिंतेत कट्यावर जमुन विचारविनीमय करत होती.
आपण एकविसाव्या शतकाकडे चाललो आहोत. ईथे बसुन प्रगतीच्या, तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या गप्पा मारतो, आणि आपल्या आजुबाजुला अजुन ही भुतं ववरत आहेत ही खुप खेदाची बाब आहे. अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम खेड्यांबरोबरच शहरात देखिल करणे खुप गरजेचे आहे असे मला वाटते. खेडेगावांपेक्षा शहरात फोफावणारी अंधश्रद्धा आधी नष्ट झाली पाहीजे. या अशा भुताटक्यांमध्ये पुण्यासारख्या शहरातील तरुण पिढी ओढली जात आहे, त्यांना वेळीच परावृत्त करणे गरजेची आहे असे मला वाटते.
वरील घटना ही सत्य घटना असुन पुण्यातील पर्वतीदर्शन भागात साधारण दोन-एक आठवड्यापुर्वी घडली आहे. अशा घटनी ईथे सतत घडत असतात. येथील बहुसंख्य तरुण मंडळी कपाळाला भंडारा लावुन फिरतांना दिसतील. ईथे बर्‍याच कुटुंबांमध्ये (सुशिक्षीत सुद्धा) मुल जन्माला यायच्या आधिच तिची लिंग तपासणी पर्वती जवळच्या (नाव सांगत नाही) नावाजलेल्या डॉक्टर कडुन करुन घेतात व मुलगी आहे असे निदान झाल्यास गर्भपात करुन घेतात. अंगात देवाची वारी येण हे खुप कॉमन आहे, अगदी इथल्या कही तरुणांच्या अंगात सुद्धा देवाची वारी येतात.
ह्य भुतांना लवकर मानगुटीवरुन उतरविले पाहिजे. . .

1 Comments:

Blogger paamar said...

'लिंग तपासणीनंतर केलेला गर्भपात' ही तर अंधश्रद्धा नसून चक्क डोळसपणे केलेला गुन्हा आहे !

10:24 PM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home