Name:
Location: Pune, Maharashtra, India

Software Engineer, Project Manager, Nakshatra Jyotish Ratna

Monday, January 09, 2006

बलात्कार! मीडियाने केलेला

पेपर मध्ये "गुडीया"च्या मृत्युची बातमी वाचली आणि हे चर्चासत्र सुरु करावेसे वाटले. गुडीया केबल टीव्ही बघणार्‍या नागरीकांसाठी अनोळखी नाही. न्युज चॅनल्स बघणार्‍या दर्शकांसाठी तर ती नविन नाहीच. काही महीन्यांपुर्वी एका वृत्त-वाहिनीवर "गुडिया" जवळपास आठवडाभर चर्चेचा विषय होती. तिच्या परिस्थीतीचे वृत्तवाहिन्यांनी अक्षरशा धिंडवडे काढले. जवळपास आठवडाभर स्टुडियोमध्ये वेगळ्या मान्यवरांना बोलावुन त्यावर खमंग चर्चा केली गेली. तिने पहिल्यानवर्‍याकडे परत जावे की दुसर्‍या नवर्‍याबरोबर रहावे ह्या बद्दल लोकांची मत मागितली गेली. मोठी पोलिंग इव्हेंट केली गेली. अगदी, "ग़ुडिया पहिल्या नवर्‍याबरोबर जाईल की दुसर्‍या" अशा जाहिराती करुन त्याबद्दल दर्शकांमध्ये स्पर्धा घेतली गेली. सर्वात कळस म्हणजे तिला स्टुडियोत आणुन सर्व लोकांसमोर, तिच्या दोन्ही नवर्‍यांसमोर खोदुन खोदुन तिचे मत व निर्णय विचारला गेला. तिने पहिल्याबरोबर जाणार असे म्हंटले की, त्यावरुन तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला गेला. भारत भरातिल दर्शकांना तिला फोन वरुन प्रश्न विचारायला लावली आणि त्याची तिला उत्तरं देण्यास भाग पाडले गेले. आणि हे सर्व करुन त्या वाहिनेने स्वत:चे टि. आर. पी रेटींग वाढवले.
त्यानंतर आता तिच्या मृत्यची बातमी वाचायला मिळाली. ती आजाराने गेली. मला वाटते, ह्या सर्वास कारणिभुत मिडीया ने केलेला तिच्यावरचा बलात्का आहे. होय.. मी त्याला बलात्कारच म्हणणार. मिडीयाचा गैरवापर करुन एका स्त्रिच्या चारित्र्याचा, तिच्या आत्मसन्मानाचा, तिच्या विचारांचा, तिच्या नात्यांचा आणि तिच्या मनाचा एका वृत्तपत्र-वाहीनिने, स्वत:ची शेखी मिरवण्यासाठी विकृत ध्येयाने पछाडलेल्या काही पत्रकारांनी, स्वत:च्या स्वार्थासाठी केलेला बलात्कार.
आणि त्यात सहभागी झाले, सर्व दर्शक, ज्यांनी चवीने हा बलात्कार होताना बघीतला, ते करणार्‍यांना प्रोत्साहन दिले. मानव हक्क आयोग, स्त्रि हक्क समिती सुद्धा तितकीच दोषी आहे कारण ते या बलात्काराला थांबवु शकले नाहीत, एवढंच नहे तर हा बलात्कार झाल्यावर सुद्धा ते गप्प बसले.

सद्ध्या असे अनेक बलात्कार रोज वृत्तपत्र-वाहिन्या करत आहेत "सनसनी" बातमी करुन.

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home